रस्त्यावरील वाहनातून डिझेल चोरी करणारा अटकेत

On: March 22, 2025 4:52 PM

जळगाव : रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असणा-या जड वाहनाच्या इंधन टाकीतून डिझेल चोरी करणा-यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील सचीन दगडु ठाकुर असे या डीझेल चोरट्याचे नाव आहे. जळगाव शहरातील दिक्षीतवाडी येथील रहिवासी अभिषेक तिवारी यांनी या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या चारचाकी ट्रक मधून डिझेल चोरीच्या घटना वाढल्या होत्या.

अटकेतील सचिन ठाकुर याच्या ताब्यातील चोरीचे 9 हजार 200 रुपये किमतीचे शंभर लिटर डिझेल हस्तगत करण्यात आले आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या गुन्हे शोध पथकातील पोउपनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेका गणेश शिरसाळे, पोना योगेश बारी, पोका छगन तायडे, नितीन ठाकुर, किरण पाटील, राहुल घेटे आदींनी या तपास व कारवाईकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment