जळगाव : धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील नितीन ब्राम्हणे हा लाचखोर ग्रामविकास अधिकारी टक्केवारीच्या लाचखोरी प्रकरणी जळगाव एसीबी पथकाच्या सापळ्यात अडकला आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील तक्रारदाराने खर्दे बुद्रुक गावातील गटार व गावहाळ बांधून दिले होते. या दोन्ही कामाचे 2 लाख 70 हजार रुपयांचे बिल झाले होते. दोन्ही कामांच्या बिलाची रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा झाली होती.
या कामाच्या मोबदल्यात सुरुवातीला दहा टक्क्याप्रमाणे 27 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तुम्ही सरपंचांना देखील काही देत नाही आणि तुम्ही जवळचे आहात म्हणून 25 हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणत ग्राम विकास अधिकारी नितीन ब्राम्हणे यांनी तक्रारदारास लाचेची मागणी केली.
पोलिस उप अधिक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलिस उप निरीक्षक सुरेश पाटील (चालक), पोना किशोर महाजन, पो. कॉ अमोल सुर्यवंशी आदींनी या कारवाईकामी सहभाग घेतला.