जळगाव : जळगाव शहराच्या शिवाजी नगर परिसरातील रहिवासी असलेला मयुर संजय जगताप हा तरुण बेपत्ता झाला असून याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला मिसींग दाखल करण्यात आली आहे. त्याच्या बाबत कुणाला काही माहिती असल्यास जळगाव शहर पोलिस स्टेशनला 0257 2229693 अथवा पोलिस नाईक मुदस्सर काझी (9923442141) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बेपत्ता तरुणाचे वडील संजय जगताप यांनी याबाबत शहर पोलिस स्टेशनला 14 मार्च रोजी मिसींग दाखल केली असून अद्याप मयुरचा शोध लागलेला नाही. स्वस्तिक प्लायवुड या दुकानात कामाला जातो असे सांगून तो 13 मार्च रोजी घराबाहेर गेला. त्यानंतर तो घरी आला नाही. बेपत्ता मयुरच्या मानेच्या खाली त्रिशुल व हातावर शंकर भगवान यांची नक्षीकाम गोंदलेले आहे.