जळगाव : आगामी रमजान ईद, श्रीराम जयंती, हनुमान जयंती, गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंती आदींच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता रहावी यासाठी जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे शांतता बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. या बैठकीला जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, भुसावळ उप विभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, जळगाव उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत तसेच जळगाव शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच जळगावातील सर्व समाजाचे प्रतिनिधी व नागरीक उपस्थित होते.
सध्या सोशल मिडीयावर समाजात तेढ निर्माण होईल असे संदेश अथवा स्टेटस ठेवण्यात येते. त्यामध्ये तरुण मुलांची संख्या लक्षणीय असल्याच्वे दिसून येत आहे. अशा प्रकारचे स्टेटस संदेश ठेवण्या-यावंर जागरुकपणे लक्ष ठेवून जनतेने त्याबाबतची माहीती पोलीसांना देणे आवश्यक आहे. मिरवणुकीमध्ये आक्षेपार्ह गाणे वाजवुन शातंता बिघडत असेल तर त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.
सायबर गुन्हयाबाबत जागरुक राहणे आवश्यक असल्याचे डॉ. महेश्वर रेड्डी यांनी याप्रसंगी नमुद केले. दंगल घडवुन शातंता बिघडवणा-यांना रोखण्याची जबाबदारी शांततां कमेटीची आहे. जमावाला रोखणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे काम शांतता समितीचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी याप्रसंगी नमुद केले. शांतता कमेटीच्या सदस्यांनी त्यांच्या सुचना यावेळी कथन केल्या. कार्यक्रम संपल्यावर उपस्थित सर्व शांतता कमेटीच्या सदस्यांना जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातुन हेल्मेट वितरीत करण्यात आले.