जिल्हाधिकारी वापरत असलेल्या टुरिस्ट कारसह नंबर प्लेट ठरली वादग्रस्त

जळगाव – जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद वापरत असलेली टुरिस्ट कार वादग्रस्त ठरली होती. आता या टुरिस्ट कारची नंबर प्लेट वादग्रस्त ठरली आहे. एमएच 19 सीएक्स 3269 ही टुरिस्ट कार जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सध्या वापरत आहेत. या कारच्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता यांनी तक्रारी केल्या होत्या. 

त्या तक्रारींची दखल घेत जुनी नंबर प्लेट पूर्णपणे काढून त्यावर नव्याने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. जुन्या नंबर प्लेटवर नवीन नंबर प्लेट लावून कारवाईचा देखावा करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. 

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद वापरत असलेल्या टुरिस्ट कार वरील सोनेरी रंगाच्या नंबर प्लेटवर जिल्हाधिकाऱ्यांचे पदनाम ठळकपणे लिहिलेले होते. असे पदनाम असणा-या नंबर प्लेट आर्थिकदृष्टया मागास राज्यातील अधिकारी लिहितात असे म्हटले जाते. त्यावर सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी टिपणी केली होती. आता त्याच सोनेरी रंगाच्या नंबर प्लेटवर पिवळ्या रंगाची व त्यावर काळ्या अक्षरातील प्लेट बसवण्यात आली आहे. हा देखील एक टीकेचा विषय झाला आहे. ललित शामसिंग गिरासे यांच्या नावावर ही टुरिस्ट कार असून ती शोरुम मधून बाहेर पडण्यापूर्वी तिला नियमानुसार एचएसआरपी नंबर प्लेट लावली होती असे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here