जळगाव : गोरखपूर-बंगळुरू या विशेष गाडीने कानपूर ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या तरुणीसोबत गैरवर्तन करणाऱ्या तिवारी आडनाव असलेल्या तिकीट तपासणीचा विरुद्ध भुसावळ स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमाड पोलिसांनी घेतलेल्या प्रवासी तरुणीच्या जवाबाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
06530 गोरखपूर – बंगळुरू या ग्रीष्मकालीन विशेष प्रवासी रेल्वे गाडीने फिर्यादी तरुणी कानपूर येथून पुण्याला जात होती. तिथे तिकीट आरएसी होते त्यामुळे तिने तिकीट तपासणीस तिवारी याच्याकडे जागेच्या उपलब्धतेची विचारणा केली. तिवारी याने तरुणीला अगोदर बी – 4 या कोच मध्ये बसण्यास सांगितले त्यानंतर तिला ए – 1 या कोच मधील पाच क्रमांकाची सीट देण्यात आली.
तिच्यासोबत तिकीट तपासणीस तिवारी हा देखील बसला. त्याने तिला अयोग्य प्रकारे स्पर्श केला. सुरुवातीला हा स्पर्श चुकून झाला असेल असे समजून तिने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र हा प्रकार पुन्हा झाल्यामुळे तरुणी घाबरली. ती जागेवरून उठून काही वेळ कोच मधील स्वच्छतागृहात गेली. मात्र तेथे देखील तिवारी तिची वाट बघत बाहेर थांबला. अखेर फोन करुन तिने हा प्रकार तिच्या वडिलांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यानंतर तिवारी या टी सी विरुद्ध कारवाई करण्यात आली.