घाटंजी पोलीस ठाण्यात शांतता समिती बैठक उत्साहात

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) :– घाटंजी येथील पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राजेश घोडके उपस्थित होते.

रमजान ईद, रामनवमी, भगवान महावीर जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घाटंजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता कमेटीची सभा आयोजित करण्यात आली. या वेळी घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रमजान ईद, रामनवमी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांतपणे उत्सव साजरे करावे. कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये याची दक्षता घ्यावी, असे पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांनी सांगितले.

या वेळी शातता समितीचे सदस्य विक्रम जयस्वाल, माजी नगराध्यक्ष राम उर्फ बाळू खांडरे, भाजपाचे घाटंजी तालुका अध्यक्ष सुरेश डहाके, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विष्णू नामपिल्लेवार, सामाजिक कार्यकर्ते मधुकर निस्ताने, प्रा. भगवान डोहाळे, उस्मान मामू, भाजपाचे ज्येष्ठ नेते भावेश सूचक, सरचिटणीस मनोज हमांद, राहुल गायकवाड, भाजपाचे गोपाल काळे, विष्णू कोवे, संदीप अग्रहारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here