जळगाव : चोरीच्या चार मोटार सायकलींसह चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील रहिवासी विक्रम भिका चव्हाण असे या मोटरसायकल चोरट्याचे नाव आहे. जळगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असलेले तीन व जिल्हा पोलीस स्टेशनला दाखल एक असे एकुण चार मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. हे चारही गुन्हे विक्रम भिका चव्हाण यांनी केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सुरुवातीला अज्ञात इसमाविरुद्ध दाखल असलेले हे सर्व गुन्हे विक्रम चव्हाण याने केले असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे या तपासाला आणि कारवाईला वेग देण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ अक्रम शेख, पोहेकॉ विजय पाटील, प्रविण भालेराव, हरीलाल पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील कारवाई कामी अटकेतील विक्रम चव्हाण यास जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल उमेश भांडारकर करत आहे.