भारतरत्न भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. डॉ. अविराज तायडे यांचे गीत गायन

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : मराठी नवीन वर्ष व चैत्र पाडव्याच्या निमित्याने भारतरत्न भीमसेन जोशी यांचे शिष्य व किराणा घराण्याचे नाशिक येथील प्रख्यात गायक पंडित डॉ. अविराज तायडे यांच्या अभंगवाणी या भावगीत, भक्तिगीते व शास्त्रीय गायन कार्यक्रमाचे घाटंजी येथे आयोजन करण्यात आले आहे.

संस्कृती विकास संस्था, घाटंजी द्वारा आयोजित या कार्यक्रमाचे गायक अविराज तायडे किराणा घराण्याचे गायक असून संगीताचे शिक्षण देवराव भालेराव, पंडित रामभाऊ माटे, पंडित सी. आर. व्यास यांच्या व भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या  कडून घेतले आहे.

अविराज तायडे यांचे प्राथमिक शिक्षण घाटंजी येथे झाले आहे. घाटंजी शहर ही त्यांची जन्मभूमी आहे. ते श्री. समर्थ विद्यालय घाटंजीचे मुख्याद्यापक स्व. आबासाहेब तायडे यांचे सुपुत्र आहेत. एस. एन. डी. टी. विद्यापीठ मुंबईचे अधिष्ठाता म्हणुन व एस. एम. आर. के. महिला महाविद्यालय, नाशिकचे संगीत प्रमुख म्हणुन त्यांनी कार्य केले आहे.

आजवर त्यांना मानाचा  पं. भीमसेन रत्न पुरस्कार, भीमसेन जोशी कलारत्न पुरस्कार, अध्यापन एक्सलन्स पुरस्कार मिळाले आहे. तर अखिल भारतीय स्तरावरील युवा महोत्सवात शास्त्रीय संगीतात संपूर्ण देशातून ते प्रथम आले आहेत.

अविरत साधना व दुर्दम्य इच्छा शक्तिच्या बळावर त्यांनी हे ध्येय प्राप्त केले आहे. मलेशियाच्या टेम्पल ऑफ फाइन आर्ट महाविद्यालयात १६ वर्षा पासून कार्यरत असलेले आतापर्यंत आपल्या देशात तसेचविदेशात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, थाइलंड, सिंगापूर इत्यादी देशात संगीताचे कार्यक्रम सादर केले आहे. ते भारत सरकारच्या सेन्सार बोर्डचे सदस्य आहेत. पुढील दोन महिन्यात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे व अविराज तायडे अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 

घाटंजी येथे होणाऱ्या अभंगवाणी या गायनाच्या अभूतपूर्व मेजवाणीच्या कार्यक्रमाला ज्यांनी आयुष्य भर पंडित भीमसेन जोशी यांना साथसंगत करनारे पं. नाना मुळे यांचे शिष्य पं. नितिन वारे, नाशिक तबला वर साथ संगत करणार आहे. प्रा. ज्ञानेश्वर कासार, नाशिक हे हार्मोनियम व गायन साथ देणार आहे. देवरावजी भालेराव बासरी वर साथ देणार आहे. प्रा. हेमंत खडके निरूपण करणार आहे. 

घाटंजी येथील चैत्र पाडवा या कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष असून मागील वर्षी गायक संतोष मानकर यांचा संगीत मैफील कार्यक्रम झाला होता. या वर्षीचा हा कार्यक्रम सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ ला सायंकाळी ६ वाजता  पामपट्टीवर ले आउट व प्रोफेसर कॉलनी, घाटंजी यवतमाळ अर्बन बॅंके मागे, घाटंजी (जिल्हा यवतमाळ) येथे आयोजन केले आहे. या अभंगवाणी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्कृती विकास संस्थेचे सचिव प्रशांत उगले व पामपट्टीवार ले आउट व प्रोफेसर कॉलनीतील रहिवासी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here