एक कोटी रुपयांची फसवणूक – अवधूतवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : एक कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी हर्षिता कंन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापक चीट्टी कालिदास यांनी केलेल्या तक्रारीवरुन फरहान ट्रेडर्सचे निलोफर सैयद फिरोज (५८), राॅयस एटंरप्राईजेसचे सैय्यद फरहान सैय्यद फिरोज यांचे विरुद्ध अवधुतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (५), ३१८ (३) (४), ३ (५) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वर्धा – यवतमाळ – नांदेड रेल्वे मार्गाचे काम सुरू असून कळंब ते यवतमाळ रेल्वे स्टेशनपर्यतंचा पुल बांधकाम करण्याचे कंत्राट हर्षिता कंन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. पुलाचे बांधकाम करण्यासाठी साहित्याचा पुरवठा करण्याकरीता भोसा (यवतमाळ) येथील फरहान ट्रेडर्सचे निलोफर सैयद फिरोज, राॅयस एटंरप्राईजेसचे सैय्यद फरहान सैय्यद फिरोज यांच्या सोबत तोंडी करार करण्यात आला होता. त्यापैकी हर्षिता कंन्स्ट्रक्शन कंपनीने RTGS करुन ९९ लाख ९९ हजार ९९८ रुपये पुरवठादारांना पेमेंट केले होते. परंतु, एक वर्षाचा कालावधी लोटुनही पुल बांधकाम साहित्याचा पुरवठा केला नाही. त्यावरुन दोघांविरुद्ध अवधुतवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अवधुतवाडी पोलीस पुढील तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here