घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील भिमकुंड येथे सिमेंट रोड लगत पारवा ते पिंपळखुटी रोडला लागुन मंगळवारी सकाळी ७ वाजता विना परवाना रेतीची अवैध रित्या वाहतूक करत असतांना दोन ट्रॅक्टर महसूल विभागाला आढळले. महसूल विभागाने ते जप्त केले आहेत.
घाटंजी तहसील कार्यालयाचे तहसीलदार विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्ली मंडळ अधिकारी पी. आर. कांबळे, झटाळा तलाठी डी. एम. किणाके, सायतखर्डा तलाठी आर. डी. राठोड व ताडसावळी तलाठी आर. पी. कुमरे आदींनी सदर कारवाई केली. संबधीत ट्रॅक्टर मध्ये प्रत्येकी एक ब्रास अवैध रेती होती. घाटंजी तहसील कार्यालयातील शिपाई तुळशीराम मेश्राम यांच्या ताब्यात सदर ट्रॅक्टर सुपूर्द नाम्यावर देण्यात आला. महसूल विभागाची पुढील कारवाईची प्रक्रीया सुरू आहे.