चेन्नई : आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे प्रतिनिधीत्व करणारा हरभजन सिंह याला ४ कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी खासगी कारणास्तव हरभजन याने आयपीएलमधून माघार घेतली होती. त्यानंतर चेन्नई येथील एका उद्योगपतीने हरभजनची ४ कोटी रुपयात फसवणूक केली आहे. गेली कित्येक वर्ष या उद्योगपतीने हरभजनकडून पैसे घेतले आहेत. ते पैसे तो उद्योगपती परत करत नसल्यामुळे नाईलाजास्तव हरभजन याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या उद्योगपतीने मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.
सन २०१५ मधे आपल्या एका मित्राच्या ओळखीने हरभजन चेन्नईच्या जुहू बीच येथील रहिवासी जी. महेश या उद्योगपतीसोबत भेटला होता. यावेळी महेशच्या उद्योगासाठी हरभजनने ४ कोटी रुपये कर्जाच्या रुपात दिले होते. त्यानंतर हरभजनने आपले पैसे परत मिळवण्यासाठी महेश सोबत संपर्क साधला. मात्र त्याने हरभजन यास टाळले. गत महिन्यात महेशने हरभजनला दिलेला २५ लाख रुपयांचा चेक पुरेशा बॅलन्स अभावी बाद झाला. अखेर हरभजनने महेश विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. चेन्नई पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.