प्रा. डॉ. संगीता पाटील यांचे निधन

जळगाव : मुळजी जेठा महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील प्राध्यापिका डॉ. सौ. संगीता विजयसिंग पाटील (वय ५४) यांचे मेंदू मधे रक्तस्त्राव (sub arachnid brain hemorrhage) झाल्याने 2 मार्च रोजी दुःखद निधन झाले. आज त्यांच्यावर हडसन ता. पाचोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई येथील नानावटी रुग्णालयात गेल्या दहा दिवसांपासून त्या मृत्यूशी झुंज देत होत्या.

डॉ. सौ. संगीता विजयसिंग पाटील या जैन इरिगेशन मधील विजयसिंग लोटन पाटील यांच्या पत्नी, सौ. सुकन्या कुलकर्णी व अंकित पाटील यांच्या आई आहेत. त्या मु. जे. महाविद्यालय, जळगाव येथे वाणिज्य विभागात प्रोफेसर म्हणून कार्यरत होत्या. त्या बोदवड येथील शिक्षक अजयसिंग पाटील व भुसावळ येथील गंगाराम प्लॉट भागातील सुरेन्द्रसिंग पाटील यांच्या भगिनी होत्या. त्यांच्या निधनाने भुसावळ, वराडसीम आणि पाचोरा तालुक्यातील हडसन या गावी नातेवाईकांमधे शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here