रोज एक बिअर आणि दरमहा दहा हजाराची खंडणी मागणा-या तिघांविरुद्ध गुन्हा

friends toasting beer bottles

जळगाव : दररोज एक बिअरची बाटली आणि महिन्याला दहा हजार रुपयांच्या खंडणीची मागणी वाईन शॉप मालकाकडे करणा-या तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्यस्थितीत जळगाव शहरातून जाणा-या महामार्गालगत  गुजराल पेट्रोल पंपानजीक अमोल संतोष कोळी यांच्या वाईन शॉपवर 1 एप्रिल रोजी रात्री हा प्रकार घडला.

आकाश पाटील, दीपेश पाटील व अक्षय कोळी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघे जण 1 एप्रिल रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास वाईन शॉपवर आले. त्यांनी काही वस्तू घेतल्या. त्यानंतर अमोल कोळी याने संबंधिताकडून घेतलेल्या वस्तूचे पैसे मागितले. त्यावर आकाश पाटील, गंप्या ऊर्फ अक्षय राठोड (रा. पिंप्राळा), दीपेश ऊर्फ फॉक्सन पाटील (रा.मानराज पार्क) या तिघांनी पैसे देण्यास नकार दिला.

आमच्याकडून पैसे घ्यायचे नाहीत, आमचा रेकॉर्ड तुम्हाला माहिती नाही का…? असे म्हणत अमोल कोळी याला शिवीगाळ सुरु केली. तुला धंदा करायचा असेल तर दररोज बिअर व महिन्याला दहा हजार रुपये आम्हाला द्यावे लागतील अशी धमकी दिली. अमोल कोळीला चॉपरने मारण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळदेखील केली. या प्रकरणी अमोल कोळी याच्या फिर्यादीवरुन आकाश पाटील, दीपेश पाटील व अक्षय कोळी या तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शांताराम देशमुख करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here