अनुभूती बालनिकेतनच्या समर कॅम्पची होणार सुरवात

जळगाव दि. ४ प्रतिनिधी –  अनुभूती बालनिकेतनमध्ये  7 ते 21 एप्रिल दरम्यान 3 ते 7 वर्षे वयाच्या मुलांसाठी एक अभिनव समर कॅम्प आयोजित केला आहे. या कॅम्पमध्ये ३५ मुलांनी सहभाग घेतला आहे. मुलांच्या सर्वांगीण आणि शालेय बाह्य कौशल्य विकसित करण्यासाठी विविध क्रियाकलाप या वैशिष्ट्यपूर्ण समर कॅम्पमध्ये घेण्यात येणार आहेत. मुलं विज्ञान, गणित, नृत्य, नाटक आणि खेळकुद यांसह अनेक इंटेरेस्टींग आणि नाविन्यपूर्ण क्रियाकलापांमध्ये भाग घेतील. 

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि रोबोटिक्ससारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांवर आधारित कार्यशाळाही आयोजित केली जाईल, ज्यामध्ये मुलं खेळ-खेळातून या तंत्रज्ञानांचा अभ्यास करतील. यासोबतच, नवीन कृषी पद्धतींविषयी मुलांना माहिती दिली जाईल, जसे की आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शाश्वत कृषी पद्धती, ज्यामुळे मुलं निसर्गाच्या आणि तंत्रज्ञानाच्या जोडणीचा अनुभव घेऊ शकतील.

व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्ये, समस्या सोडवण्याची क्षमता यावर विशेष सत्रे घेण्यात येतील. विविध खेळांमध्ये सहभागी होऊन मुलं टीमवर्क आणि समन्वय शिकतील. या कॅम्पमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते भविष्यकालीन तंत्रज्ञानासोबत कसे जुळवून घेऊ शकतात हे समजून घेतील. शिक्षक आणि कर्मचारी एक सुरक्षित आणि प्रेरणादायक वातावरण निर्माण करतील, जे मुलांना नाविन्याची आणि चिंतनशीलतेची प्रेरणा देईल. सहभागी होण्यासाठी अनुभूती बालनिकेतनशी (जैन व्हॅलीच्या समोर) संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here