घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) – पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे जनावर, जंगली प्राणी व शेतीचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पैनगंगा नदीत धरणाचे पाणी सोडण्याची मागणी दातोडी (ता. आर्णी) परिसरातील नागरिकांनी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी विकास मीना व आमदार प्रा. राजू तोडसाम यांच्या कडे केली आहे.
पैनगंगा नदी काठच्या दातोडी, माळेगांव, वरुड (तुकाराम), कौठा, उमरी (कापेश्वर) आदीं गावातील सरपंच यांनी ग्रामपंचायत ठरावा द्वारे शासनाकडे केली आहे.
या वेळी आर्णी पंचायत समितीचे माजी सभापती विजय पाटील राउत, गजानन जगताप, प्रा. प्रदीप राउत, अमीत ठाकरे, संदीप गाढवे, केशव मेश्राम, पंजाब पाटील, देविदास गेडाम, ओमप्रकाश पाटील, मनोज गावंडे, योगेश पाटील, विपुल जगताप आदीं उपस्थित होते.