एक कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी दोघांना अटकपूर्व जामीन

On: April 8, 2025 4:51 PM

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) – एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी यवतमाळ जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघांचा अटकपुर्व जामीन मंजूर केला आहे. या फसवणूक प्रकरणी हर्षिता कंन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक एस. एम. श्रीनिवास रेड्डी यांच्या वतीने व्यवस्थापक चीट्टी कालिदास राजाराव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अवधूतवाडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. यवतमाळ येथील फरहान ट्रेडर्सचे संचालक सैय्यद फिरोज यांची पत्नी निलोफर सैयद फिरोज (वय ५८, मु. पो. कुर्ली ता. घाटंजी, ह. मु. भोसा रोड, यवतमाळ) आणि राॅयस एटंरप्राईजेसचे संचालक तथा सैय्यद फिरोज यांचा मुलगा सैय्यद फरहान सैय्यद फिरोज (वय ३०, मु. पो. कुर्ली ता. घाटंजी, ह. मु. भोसा रोड, यवतमाळ) अशा दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (५), ३१८ (३) (४), ३ (५) अंतर्गत हा फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

संशयीत आरोपींच्या वतीने ॲड. उमेशकुमार बिसेन यांनी अतिरिक्त व सत्र न्या. आर. एस. साळगावकर यांच्या न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर युक्तीवाद झाला. न्यायालयाने संशयीत आरोपी  निलोफर सैयद फिरोज व त्यांचा मुलगा सैय्यद फरहान सैय्यद फिरोज यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर मंजूर केला आहे. हर्षिता कंन्स्ट्रक्शन कंपनीकडून अर्जदार एस. एम. श्रीनिवास रेड्डी यांचे मार्फत सरकारी वकीलांना न्यायालयात सहकार्य करण्यासाठी ॲड. इम्रान देशमुख हे असीस्ट टु प्रोस्युकेशन म्हणून उपस्थित होते.

हर्षिता कंन्स्ट्रक्शन कंपनीचे यवतमाळ येथे कार्यालय असून वर्धा – यवतमाळ – नांदेड रेल्वे मार्गाचे काम सुरु आहे. कळंब ते यवतमाळ रेल्वे स्टेशनपर्यतंच्या पुलाचे बांधकाम करण्याचे कंत्राट आंध्रप्रदेश येथील हर्षिता कंन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे.या बांधकामासाठी सिमेंट व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी तोंडी करारानुसार हर्षिता कंन्स्ट्रक्शन कंपनीने निलोफर सैय्यद फिरोज व सैय्यद फरहान सैय्यद फिरोज या पुरवठादारांना वेळो वेळी आरटीजीएस च्या माध्यमातून ९९ लाख ९९ हजार ९९८ रुपये दिले होते. एक वर्षाचा कालावधी उलटून देखील कंपनीने सिमेंट व इतर बांधकाम साहित्याचा पुरवठा केला नाही. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment