जेलमधे मिळाला आरोपीच्या पत्नीचा मोबाईल नंबर – बाहेर येताच “सुखा”साठी राजसिंगने कसली कंबर!!

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): वयाची तिशी पार केलेली करिश्मा व्यवसायाने शिक्षीका होती. दिसायला देखणी असलेली करिश्मा जळगाव जिल्ह्यातील एका शैक्षणीक संस्थेत शिक्षिकेची सेवा बजावत होती. दिसायला देखणी असलेली करिश्मा वयाच्या पस्तीशीत तिन मुलांची आई होती. तिन मुलांची आई असली तरी करिश्माचे तारुण्य तसुभरही कमी झाले नव्हते. तारुण्यसुलभ करिश्माचे तारुण्य दिवसेंदिवस खुलत होते. त्यामुळे साहजीकच तरुणांच्या नजरा ती रस्त्याने पायी चालतांना तिच्या रुपावर खिळत असत.

दुर्दैवाने एके दिवशी खूनाच्या एका गुन्ह्यात तिच्या पतीला गजाआड व्हावे लागले. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिच्या पतीला कारागृहात जाण्याची वेळ आली. अशा कठीण प्रसंगातही करिश्मा अजिबात डगमगली नाही. आपला संसार आणि तिन मुलांचे पालणपोषण तीने योग्य प्रकारे सुरु ठेवले. पती कारागृहात असतांना शिक्षिका असलेली करिश्मा एकटी पडली. मात्र तिने हिंमत सोडली नाही.

कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या करिश्माच्या पतीची दुस-या एका बंदीवान आरोपीसोबत ओळख झाली. राजसिंग अग्नीदेवसिंग चव्हाण असे कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या त्या दुस-या बंदीवान आरोपीचे नाव होते. काही दिवसांनी राजसिंग हा जेलमधून बाहेर येणार होता. एकाच कारागृहात सोबत शिक्षा भोगत असल्यामुळे करिश्माचा पती आणि राजसिंग या दोघांची ओळख झाली. बघता बघता दोघांची घनिष्ठ ओळख झाली. त्या ओळखीतूनच जेलमधे असतांना करिश्माच्या पतीने करिश्माचा मोबाईल क्रमांक राजसिंग याला दिला. राजसिंग याचा मोबाईल क्रमांक देखील करिश्मापर्यंत पोहोचला होता. जेलमधील पतीला काही निरोप द्यायचा असल्यास करिश्माने तो निरोप राजसिंगच्या मोबाईलवर कळवावा असा त्यामागचा हेतू होता. तसेच काही अडी अडचण आल्यास करिश्माने ती अडचण राजसिंगला सांगावी हा देखील त्यामागचा हेतू होता.

suspected accused rajsing

काही दिवसांनी राजसिंग जेलमधून बाहेर आला. करिश्मा तिच्या पतीसाठी असलेला निरोप राजसिंग याला त्याच्या मोबाईलवर देत असे. तो निरोप राजसिंग व्यवस्थितपणे जेलमधील करिश्माच्या पतीपर्यंत पोहोचवत असे. अशा प्रकारे दोघा पती पत्नी मधे राजसिंग व त्याचा मोबाईल क्रमांक एक प्रकारे संदेशवहनाचा सेतू बनला होता. एके दिवशी राजसिंग याने करिश्माला प्रत्यक्ष भेटण्याचे नियोजन केले. गेल्या वर्षी दिवाळी सणाच्या कालावधीत फोन करुन तसेच एका गुन्हेगाराची ओळख दाखवत राजसिंग याने करिश्माची प्रत्यक्ष भेट घेतली. त्या दिवशी करिश्माचे शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला जाण्याचे नियोजन होते. झालेल्या भेटीत दोघांनी सोबत शिर्डी येथे जाण्याचे निश्चित केले. दोघे जण सोबत शिर्डी येथे गेले.

शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर दोघांची जवळीक वाढली. पती कारागृहात असतांना त्याच्या पश्चात करिश्मा आणि जेलमधून बाहेर आलेला राजसिंग यांच्यातील परिचय वाढत गेला. करिश्माने राजसिंग यास तिच्या कारवर चालक व इतर कामासाठी ठेवून घेतले. करिश्माच्या ऑल्टो या कारचा तो चालक म्हणून काम करु लागला. शिक्षकी पेशा व्यतिरिक्त करिश्माचा सॅनिटरी पॅडचा देखील व्यवसाय होता. तिच्या या व्यवसायात देखील तो हातभार लावू लागला. करिश्माच्या व्यवसायासाठी काम करणारा एक कामगार तिच्या घरी रहात होता. त्या कामगारासोबत राजसिंग देखील राहू लागला. अशा प्रकारे राजसिंग हा करिश्माच्या व्यवसायात एक कामगार म्हणून काम करु लागला.

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्याअखेर करिश्मासह तिचा कामगार आणि राजसिंग असे तिघे जण एकत्र बसले होते. त्यावेळी राजसिंग याने मद्यप्राशन केले होते. राजसिंगने मद्याचा जादा प्रमाणात डोस घेतल्यामुळे त्याचे त्याच्या मनावरील ताळतंत्र सुटले होते. तो करिश्माला शिवीगाळ करु लागला. बघता बघता त्याने करिशमावर हात देखील उगारला. त्याने तिला गाडीत बसवून नेले. वाटेत एका ठिकाणी त्याने तिला ब्लेड दाखवत जीवे ठार करण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने आरडाओरड सुरु केली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजुबाजूचे लोक त्याठिकाणी जमले. त्यावेळी कसाबसा वाद मिटला. त्यानंतर तो करिश्माला चाळीसगाव येथे एका लॉजमधे घेऊन आला. त्या ठिकाणी त्याने तिच्यासोबत बळजबरी शरीर संबंध प्रस्थापीत केले. त्या प्रसंगाचे त्याने काही फोटो काढले आणि व्हिडीओ देखील तयार केला. या फोटोच्या बळावर तो करिश्माला वेळोवेळी ब्लॅकमेल करु लागला. 

या घटनेची माहिती करिश्माने तिच्या जवळच्या नातेवाईकासह काही जणांच्या कानावर टाकली. तिच्या जवळच्या नातेवाईकाने फोनवर राजसिंग याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र बोलावून देखील तो आला नाही. त्यामुळे त्याला शोधून काढण्यात आले. हे प्रकरण चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनपर्यंत गेले. पोलिस स्टेशनला राजसिंग याच्याविरुद्ध कोणतीही तक्रार देणार नसल्याची समजंस भुमिका करिश्माने घेतली. त्यामुळे राजसिंगची त्यादिवशी सुटका झाली. 

काही दिवसांनी पुन्हा राजसिंग याने तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार सुरु केला. तिच्यासोबतच्या संबंधाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकण्याची तो तिला धमकी देऊ लागला. त्याच्या धमकीला घाबरुन तिने त्याला कधी ऑनलाईन तर कधी रोखीने सुमारे तीन लाखांच्यावर रक्कम दिली. त्यानंतर देखील त्याने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले. त्याच्या या प्रकाराला वैतागून तिने त्याचे सर्व मोबाईल क्रमांक ब्लॉक केले. तरीदेखील वेगवेगळ्या क्रमांकावरुन तो तिला कॉल करुन ब्लॅकमेल करु लागला.

शरीरसंबंधाचा तो व्हिडीओ आपल्या जवळच्या नातेवाईकाला राजसिंग याने पाठवला असल्याचे तिला समजले. त्यामुळे तिने त्या नातेवाईकाला विचारणा केली. त्यावर त्या नातेवाईकाने तिला शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र आता पाणी डोक्यावरुन जात असल्याचे बघून तिने राजसिंग याच्याविरुद्ध रितसर कायदेशीर फिर्याद दाखल करण्याचे निश्चीत केले. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार राजसिंग याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भरत चौधरी करत आहेत. (या कथेतील पिडीतेचे करिश्मा हे नाव काल्पनिक आहे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here