मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसच्या नामांतरासाठी उद्या 16 एप्रिल रोजी सनदशीर व शांततेच्या मार्गाने सकल भारतीय सोनार समाज संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई सेंट्रलचे “नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस” या नामांतारासाठी हे आंदोलन केले जाणार आहे.
या आंदोलनात मुंबई, बृहन्मुंबई, नवी मुंबईतील अधिकाधिक रेल्वे, उपनगरीय रेल्वेने प्रवास करणारे चाकरमाने, व्यावसायिक, नागरिक आदींनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यपूर्व हिंदुस्थानात आशियायी रेल्वेचा पाया घालून दळणवळणाचे साधन म्हणून रेल्वेची ओळख करून देणारे, मुंबईचा सर्वांगीण विकास करणारे, मुरबाड सारख्या ग्रामीण भागात वाढलेले, आणि पुढे मुंबईत अजातशत्रू प्रथितयश व्यापारी, द्रष्टा विकासपुरुष म्हणून नावलौकिक मिळविणारे, ब्रिटिश इंडिया कंपनी सरकार आणि प्रशासनावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवणारे नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांना न्याय मिळवून देण्यासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन यशस्वी करण्याचे आवाहन या संघटनेचे संस्थापक मिलिंदकुमार सोनार यांच्या वतीने करण्यात आले आहे.