जळगाव येथील जैन इरिगेशन ह्या मानांकित कंपनीचा आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू योगेश धोंगडे यास सन २०२३–२४ करिता खेळाडू म्हणून श्री. शिव छत्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
योगेश धोंगडे याची गेल्या ५ वर्षातील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरिल उल्लेखनीय कामगिरी आधारे महाराष्ट्र राज्य सरकारने कालच ह्या पुरस्कारांची घोषणा केली.
योगेश धोंगडे यांच्या ह्या दैदिप्यमान कामगिरी बद्दल त्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री अशोक भाऊ जैन, संचालक श्री अतुल भाऊ जैन, प्रशासकीय क्रीडा अधिकारी श्री. अरविंद देशपांडे, क्रीडा समन्वयक श्री. रविंद्र धर्माधिकारी, श्री. सुयश बुरकुल, कॅरम व्यवस्थापक श्री.सय्यद मोहसिन व इतर सर्व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. सदर पारितोषिक वितरण दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी पुणे येथे होणार आहे.
ह्याच बरोबर सन २०२२–२३ ह्या वर्षातील सर्व श्री.शिव छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडूंना ही पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून त्यातही जैन इरिगेशनच्या संदीप दिवे, अभिजित त्रिपणकर व नीलम घोडके ( माजी खेळाडू) ह्या तीन खेळाडूंचा समावेश आहे.