चोरांचा सरदार पीएसआय मांटे चोरांसह पोलिस कोठडीत

On: April 17, 2025 6:38 PM

जळगाव : सज्जनांचे रक्षण करण्याऐवजी चोरांना चोरी करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांचा सरदार बनलेल्या पीएसआय प्रल्हाद पिरोजी मांटे याच्यासह त्याच्या तिघा साथीदारांना पोलिस कोठडीत जाण्याची वेळ आली आहे. चोपडा शहर पोलिसांच्या कारवाईत जालना येथील पीएसआय प्रल्हाद पिरोजी मांटे व त्याचे सराईत गुन्हेगार सहकारी अडकले. चोपडा बसस्थानकावर एका शेतकऱ्याचे 35 हजार रुपये घेवून पळून जात असलेल्या चौघा चोरट्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडण्यात चोपडा शहर पोलिस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले.

महाराष्ट्रातील विविध बसस्थानकांवर झालेल्या अनेक चोऱ्यांमध्ये पीएसआय प्रल्हाद मांटे याचा हात असल्याचे म्हटले जात आहे. कित्येक वर्ष बसस्थानकावरील प्रवाशांचे निरीक्षण आणि त्यातून चोरीच्या विविध युक्त्या त्याला सुचल्या. सेवानिवृत्तीला तिन महिने बाकी असतांना जालना येथील पीएसआय प्रल्हाद मांटे हा पोलिस कारवाईत अडकला आहे. चोपडा बसस्थानकावर चोरी करण्यासाठी आला असतांना त्याच्यावर पोलिसांची झडप पडली आणि त्याने आपला गुन्हा कबुल केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment