यवतमाळ येथे अधिकाऱ्यांचे करिअर मार्गदर्शन शिबिर व परिसंवाद

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाटील समितीच्या वतीने पंधरवडा चे आयोजन करण्यात आले होते. ते आज दिनांक 18 एप्रिल रोजी सायंकाळी 7 ते 10 वाजता महाराष्ट्रातील विविध अधिकाऱ्यांचा करिअर मार्गदर्शन शिबिर व परिसंवाद आयोजित केलेला आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, उपवन संरक्षक धनंजय वायबस (यवतमाळ), नाना मेश्राम (डायरेक्टर पी. आय. बी. गोवा) अनिल खडसे (आय. आर. एस., नागपूर) 

सचिन थोरात (आय. आर. एस., नागपूर) सौ. सुकेशनी तेलगोटे (उपायुक्त, नागपूर), प्रदीप जांभुळकर (उपव्यवस्थापक सुरक्षा, जळगाव) , नंदकुमार रामटेके (सहनिबंधक, नागपूर), मनीष चव्हाण (ठाणेदार, नागपूर एमआयडीसी), निशांत मेश्राम (ठाणेदार, काटोल) इत्यादी अधिकारी यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. तरी एम.पी.एस.सी. (MPSC) यू.पी.एस.सी. (UPSC) चा अभ्यास करणारे सर्व विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमात आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. राहुल पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here