जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): एमडी ड्रग्ज विक्रेत्यासोबत एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 352 कॉलच्या माध्यमातून संपर्कात राहणा-या पीएसआय दत्ता पोटे यांचा गॉडफादर कोण होता आणि कोण आहे याची उत्सुकता सर्वसामान्य जनतेला लागून आहे. ड्रग्ज विक्रेत्याच्या संपर्कात कुणी पोलिस अधिकारी असल्याचे आढळून आल्यास त्याची गय केली जाणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. ड्रग्ज संदर्भात झिरो टॉलरन्सी पॉलिसी राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

ड्रग्ज प्रकरणात कोणत्याही रॅंकचा पोलिस अधिकारी अथवा कर्मचारी आढळून आला तर त्याचे निलंबन नव्हे तर त्याला थेट बडतर्फच करण्यात येईल असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला होता. महाराष्ट्र पोलिस परिषद ज्यावेळी झाली त्यावेळी विविध विषयावर चर्चा झाली होती. त्यावेळी ड्रग्ज संदर्भात मुख्यमंत्री बोलत होते. आता जळगावचे पीएसआय दत्ता पोटे यांच्या बाबतीत मुख्यमंत्री काय भुमिका घेतात याकडे देखील सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून आहे.
जळगाव शहर पोलिस स्टेशनला काही महिने सेवा बजावल्यानंतर त्यांना लागलीच एमआयडीसी या हेवी वेटेड पोलिस स्टेशनमधे काम करण्याची संधी मिळाली. त्याठिकाणी काही महिने काम केल्यानंतर त्यांना लागलीच एलसीबी मधे हजर होण्याची संधी लाभली. एकाच शहरात एकाच डीव्हीजन मधे एवढ्या शिघ्र गतीने त्यांना क्रिम पोलिस स्टेशन आणि एलसीबी मध्ये पोस्टींग कशी मिळाली? त्यांच्या अंगी असे कोणते मेरीट होते? त्यांचा कुणी छुपा गॉडफादर तर नाही? या प्रश्नांची उकल व्हावी याकडे जळगावसह राज्यातील जनतेचे लक्ष लागून आहे. तब्बल 352 कॉलच्या माध्यमातून एमडी ड्रग्ज विक्रेत्याच्या संपर्कात राहणारे दत्ता पोटे त्या अबरारला काही माहिती तर पुरवत नव्हते ना? अशी देखील चर्चा लोक खासगीत करत आहेत.