यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे महिला सक्षमीकरण शिबीर

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दि. २१ व २२ एप्रिल २०२५ रोजी मुली व महिलांच्या सर्वांगीन विकास होण्याच्या उद्देशाने दोन दिवसीय आत्मरक्षणार्थ महिला सक्षमीकरण शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. या शिबीरात आरोग्य, शैक्षणिक या विषयावर निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १५ ते ३० वयोगटातील महिला या शिबीरात सहभाग घेऊ शकतात. या शिबीरात महिलांसाठी सकाळी २ तास व सांयकाळी २ तास कराटे प्रशिक्षण दिले जाणार आहे. निवासी प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांची राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आली आहे.

बाह्य वर्ग – पळसवाडी पोलीस मैदान, यवतमाळ व अंतरवर्ग – पोलीस मुख्यालय, प्रेरणा हाॅल, यवतमाळ असुन शिबीरात  फाॅर्म भरण्याचे ठिकाण अवधुतवाडी पोलीस स्टेशन यवतमाळ, यवतमाळ शहर पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ व लोहारा पोलीस स्टेशन यवतमाळ आहे. नांव नोंदणी १७ ते १९ एप्रिल २०२५ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत वेळ ठेवण्यात आली आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित महिला सुरक्षा व सक्षमीकरण शिबीरात जास्तीत जास्त महिलांनी भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here