घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) व स्व. तुळशिरामजी बहुउद्देशीयमागासवर्गीय विकास संस्था, पारवा यांच्या संयुक्त विद्यमाने घाटंजी तालुक्यातील पारवा प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी दि. २० एप्रिल २०२५ रोजी रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गरजवंत रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन, घाटंजी पंचायत समितीचे माजी सभापती रुपेश कल्यमवार यांनी केले आहे. या शिबिरात सर्व रोगांवर तज्ज्ञांकडून मोफत निदान, उपचार व विविध तपासण्या करण्यात येणार आहे. शिबिरस्थळी नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. शिबिरात येताना रुग्णांनी आपले आधारकार्ड, राशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला व आयुष्मान कार्ड सोबत आणावे.
राशन कार्डवर नांव असलेल्या सर्व नागरिकांचे मुळ (ORIGINAL) आधार कार्ड हे महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत उपचार घेण्यासाठी आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रुग्नांनी नोंदणीसाठी घाटंजी पंचायत समितीचे माजी सभापती रुपेश कल्यमवार (मोबाईल 9623465265), मुरलीधर उमाटे (मोबाईल 9921112903), धर्मेंद्र कांबळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश मुद्दलवार (मोबाईल 9623773911), बालाजी पोटपेल्लीवार (मोबाईल 09423853282), रमेश दवणे (मोबाईल 09420048772) यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन गणेश मुद्दलवार मित्र परिवार, पारवा यांचे तर्फे करण्यात आले आहे.