फरार ड्रग्ज विक्रेता अबरार संत होता का?

जळगाव : एमडी ड्रग्ज प्रकरणाशी संबंधीत जळगाव पोलिसांना  हवा असलेला अबरार नावाचा फरार गुन्हेगार जळगाव जिल्ह्यासह राज्यात चर्चेत आला आहे. या गुन्हेगारासोबत पोलिस उप निरीक्षक दत्ता पोटे यांचे तब्बल 352 वेळा कॉल झाल्याचे उघड झाले आहे. फरार अबरार ड्रग्ज प्रकरणापूर्वी पोलिसांचा काही गुन्ह्यात खबरी तर काही गुन्ह्यात फिर्यादी होता असे पोलिस उप निरीक्षक दत्ता पोटे यांचे म्हणणे आहे.

अबरार याने पोलिस उप निरीक्षक दत्ता पोटे यांना किती महत्वाच्या खबरी (टिप्स) दिल्या आणि त्या टिप्सच्या आधारे किती गुन्हे उघडकीस आले असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पोलिसांना टिप्स देणारे बहुदा गुन्हेगारच असतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. गुन्हेगारांच्या अंतर्गत वादातून अथवा एकमेकांचा वचपा काढण्यासाठी एक गुन्हेगार दुस-या गुन्हेगाराच्या विरोधात खबर पोलिसांना देत असतो. त्यातून गुन्ह्याचा शोध लागतो आणि कारवाई होत असते.

पोलिसांना टिप्स देणारा अबरार हा कुणी संत महात्मा होता का? एखाद्या गुन्ह्याची त्याच्या कर्ण पटलावर आकाशवाणी होत असे का? तो पोलिसांना टिप्स देण्याच्या कार्यकाळात त्याचा ड्रग्ज व्यवसायाशी तिळमात्र संबंध नव्हता का? खबरी होण्याच्या आडून तो अजिबात काळे धंदे करत नव्हता का? त्याची पोलिस उप निरीक्षक दत्ता पोटे यांना भनक नव्हती का? त्याच्याविरुद्ध ड्रग्ज प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर व्हाटस अ‍ॅप कॉल अथवा कोणत्याही दुस-या मार्गाने पोटे आणि त्याचा संबंध आला नाही का? असे एक ना अनेक प्रश्न जनमानसात विचारले जात आहेत.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here