संजय राऊतांना धमकी देणाऱ्यास अटक

On: September 11, 2020 4:31 PM

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकी देणा-या तरुणास मुंबई एटीएस पथकाने कोलकाता येथून अटक केली आहे. पलाश घोष असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. मुंबई पोलिसांच्या एटीएस पथकाने गुरुवारी रात्री कोलकाता येथून त्याला अटक केली. त्याला मुंबईत आणण्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरु असल्याचे समजते.

व्हिडिओ कॉलद्वारे त्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. पलाश याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याचा ट्रांझिट रिमांड घेतल्यानंतर त्याला मुंबईत आणले जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment