जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): पोलिसांना टिप्स देण्याचे काम करणारा व ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकल्यानंतर पळून जाणारा खबरबाज अबरार विदेशात पळून गेल्याचे म्हटले जात आहे. तो विदेशात पळून गेल्याचे क्षणभर गृहीत धरले तर त्याच्या गाठीशी आणि पाठीशी विदेशात पळून जाण्यासाठी आणी विदेशात मुक्कामी राहण्याइतपत धनराशी नक्कीच आहे असे म्हणण्यास वाव आहे.
गुन्हा करुन पलायन करण्यात यशस्वी झालेला अबरार ड्रग्ज विक्री करुन एवढा धनाढ्य झाला असेल तर त्याला पोलिसांचा खबरी होण्याची गरज काय होती? खबरीच्या रुपात आणि पोलिसांच्या सावलीत राहून त्याला काळे धंदे करायचे होते का? त्याला नेमका कुणाचा छुपा पाठींबा होता? असे एक ना अनेक भाबडे प्रश्न या निमीत्ताने विचारले जात आहे. सामाजिक जाणीवेचे भान ठेऊन आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून अबरार पोलिसांचा खबरी झाला का? तो जर एवढा धनाढ्य आणि बलवान असेल तर त्याने त्याच्या कुवतीनुसार पोलिसांना छुटपुट खबरी एवजी नक्कीच बड्या खबरी दिल्या असाव्यात.
बड्या खबरीचे करोडोंचे कोणते बडे छापे टाकण्यात आले? कोणत्या बड्या कारवाया झाल्या? त्या कारवाया जनतेला माहिती झाल्या नाही तरी निदान त्या कारवायांची अंकसंख्या तरी समजावी असा देखील एक प्रश्न या निमीत्ताने निर्माण झाला आहे. पीएसआय पोटे आणि खबरबाज गुन्हेगार अबरार यांच्यात 352 वेळा मोबाईल संपर्क झाला. किमान निम्मे कॉल त्या खबरीचा पाठपुरावा करण्यात उपयोगी पडले असतील तर पोलिस दलाचे भले झाले असे म्हणता येईल. ग्यारह मुल्कोकी नव्हे तर जळगाव पोलिस त्याच्या मागावर नक्कीच आहे. जिगरबाज पोलिस त्याला नक्कीच पकडून आणतील यात शंका नाही.