प्राणघातक हल्ल्यातील संशयित प्रफुल टिपले न्यायालयीन कोठडीत

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील नेहरू नगर येथे चारित्र्यावर संशय घेऊन एका महिलेच्या गळ्यावर कु-हाडीने हल्ला करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी संशयित आरोपी प्रफुल गौतम टिपले (वय ४०, रा. नेहरू नगर, घाटंजी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९ (खुन करण्याचा प्रयत्न करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी प्रफुल टिपले यास घाटंजी पोलीसांनी अटक केली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.

या घटने प्रकरणी पोलीस शिपाई साजीद खान यांनी गुन्हा दाखल केला आहे. घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे पुढील तपास करत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here