ड्रग्ज विक्रेता अबरारचे धंदे गैर–कानूनी!! — आर्थिक उलाढाली झाल्या त्याच्या हातूनी?

On: April 21, 2025 10:39 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) ‌: जळगाव पोलिस दलात सध्या चर्चेत असलेला तथाकथीत फरार एमडी ड्रग्ज विक्रेता अरबाज याचे नाव अबरार मुक्तार कुरेशी उर्फ हाजी असल्याचे समजते. पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत त्याचे नाव केवळ अबरार असे सांगितले होते. मात्र प्रसार माध्यमांमधे त्याचे नाव अबरार एवजी अरबाज असे प्रसिद्ध झाले आहे.  

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरा ढोरांची कत्तल करणे हा अबरारचा व्यवसाय होता. याशिवाय एमडी ड्रग्जची छुपी विक्री करणे हा देखील व्यवसाय होता. समव्यवसायी  हितशत्रूंची पोलिसांना खबर (टीप) देऊन तो आपला उल्लु अर्थात आपले इप्सित साध्य करुन घेत होता असे देखील म्हटले जात आहे.

गुरांची कत्तल करणा-या विरोधक व्यावसायीकांची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक तडजोड होत असे अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. या टीप देण्या घेण्याच्या माध्यमातून अबरारची पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्याशी ओळख झाली असे म्हटले जाते. एकदा ओळख झाल्यानंतर त्यांच्यात फोनवर बोलण्याचा सिलसिला सुरु झाला.

गुरांच्या कत्तलीचा बेकायदा व्यवसाय करणारा तथाकथीत अबरार संबंधीत अधिका-याला दरमहा लाखो रुपयांची शॉपींग करुन देत होता अशी कुठे दबक्या आवाजात तर कुठे खुलेआम चर्चा या निमीत्ताने होत आहे. मास्टर कॉलनी भागात केवळ मी एकटाच बेकायदा व्यवसाय करेन, माझ्याकडे लक्ष द्यायचे नाही अशी सेटींग लावण्यासाठी तो प्रयत्नशील रहात होता असे देखील म्हटले जात आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment