हॉटेलच्या भिषण आगीतून पोलिसांनी वाचवले लोकांचे प्राण

जळगाव : भडगाव रस्त्यावरील हॉटेल मनसुख येथे आज सकाळी तिन वाजेच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली. दरम्यान आगीची माहिती समजताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पीएसआय गणेश सायकर, पोलीस हवालदार अजय पाटील, नितीन वाल्हे, संदीप पाटील, पोलीस शिपाई दीपक चौधरी, ज्ञानेश्वर पाटोळे, समाधान पाटील, विलास पवार, प्रवीण पवार, राहुल नारेकर आदींनी घटनास्थळी धाव घेत आगीत सापडलेल्या सुमारे सहा ते सात जणांचे प्राण वाचवले.

हॉटेल मनसुख येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेया आगीत जनरेटरचा स्फोट झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती. मात्र प्रसगावधान राखत घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिस पथकातील पोलिस उप निरीक्षक गणेश सायकर यांना दुखापत झाली असून वैद्यकीय उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. घटनास्थळावरील सुरेश पोपट महाजन (वय 46) यांची पाठ आणि पाय भाजला गेला. मयूर लक्ष्मण कुमावत (वय 32) या तरुणाचा हात आणि पाय भाजला गेल्याने त्याला देवरे हॉस्पीटलमधे दाखल करण्यत आले आहे. फायर ब्रिगेडच्या मदतीने आग पूर्णतः नियंत्रणात आणण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर संबंधित माहिती तपासासाठी सुरक्षित ठेवण्यात आली आहे. या घटनेत पोलिसांनी दाखवलेले प्रसंगावधान व धाडस प्रशंसनीय म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here