अनैतिक संबधातून प्रेयसीची हत्या – प्रियकर अटकेत

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी शहरा लगत खापरी येथील इस्तारी नगर मधील एका  घरात संशयास्पद अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला होता. या घटनेने घाटंजी शहरासह खापरी गावात खळबळ उडाली होती. महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हा चर्चेचा विषय झाला होता.

महिलेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी घाटंजी पोलिसांनी सखोल चौकशी व  तपास केला असता या घटनेमागे प्रेमप्रकरणाची किनार असल्याचे लक्षात आले. प्रिती सचिन डाखरे (28) असे खापरी येथील मयत महिलेचे नाव आहे. तिच्या पतीचे सुमारे नऊ वर्षापुर्वी निधन झाले आहे. घाटंजी येथे विज वितरण कंपनीत ती कंत्राटी स्वरुपात नोकरीला होती.

या घटनेप्रकरणी घाटंजी पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत अजय नेवारे (वय 35, रा.कोंडजई) याला अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान त्याने आपला गुन्हा कबुल केला. जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने, ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राजेश पंडीत पुढील तपास करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here