खूनाच्या घटनेने धरणगाव तालुक्यात खळबळ

जळगाव : धरणगाव तालुक्यातील विहीर फाट्यानजीक पाठलाग करत एकाची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटने प्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे धरणगाव तालुक्यात खळबळ माजली आहे.

गोपाळ मालचे असे मयताचे नाव असून त्याच्यावर दोन ते तिन वेळा फायरिंग झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर फायर करणारा राहुल सावंत हा स्वत:हून पोलिस स्टेशनला हजर झाला. बदल्याच्या भावनेतून ही हत्या झाल्याचे म्हटले जात आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here