घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील तलाठी राजू खुशालराव मानकर यांच्या बंद घराचा कडी कोंडा तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 3 लाख 32 हजार 661 रुपयांची चोरी झाली आहे. या चोरीप्रकरणी तलाठी मानकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घाटंजी पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलाठी राजु मानकर हे घरगुती कार्यक्रमानिमीत्त येवती येथे सहकुटूंब तसेच इतर कामानिमीत्त परगावी घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान 20 एप्रिल रोजी आपल्या घराचा कडीकोंडा तुटल्याचा निरोप त्यांना यांचे परिचीत अतुल भोयर यांच्याकडून समजला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे करत आहे.