स्वाती सूर्यवंशी यांचा कारागृहातील मुक्काम वाढला

परभणी : प्रशासकीय मान्यतेसाठी साडेचार लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी पोलीस कोठडीतील निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यासह तिघांचा कारागृहातील मुक्काम अजून वाढला आहे. त्यांना परभणी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. १५ सप्टेंबर रोजी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी आहे.

गंगाखेड येथील विकासकामांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी साडे चार लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, नगरविकास विभागातील अव्वल कारकून श्रीकांत करभाजने व गंगाखेड न.पा.तील स्थापत्य अभियंता अब्दुल हकीम अब्दुल खय्यूम या तिघा लाचखोरांवर नवा मोंढा पोलीस स्टेशनला ८ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल आहे. त्यांना न्यायालयाने ११ सप्टेंबरपावेतो पोलीस कोठडी सुनावली होती.

आज शुक्रवारी त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर १५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या तिघा आरोपींचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. तिघांची जिल्हा कारागृहात रवानगी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here