अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य देणारी पृथ्वी व तिच्यावरील सर्व जीवसृष्टीसह निसर्गनिर्मित साधन संपत्तीचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन, पृथ्वी दिन म्हणून साजरा केला जातो. या वसुंधरा दिनाचैन औचित्य साधत पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्र सिंग पाटील यांनी माध्यमांसोबत संपर्क साधत आपले मनोगत व्यक्त केले.
निसर्गनिर्मित साधन संपत्ती दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. आजच्या घडीला निसर्गाचा समतोल बिघडला असून आपणास अनेक संकटांसोबत सामना करावा लागत आहे. भुकंप, ढगफुटी, वृक्षतोडीमुळे जंगलात पाण्याचा तुटवडा भासत आहे.
पाण्याच्या तुटवड्यामुळे पाण्याच्या शोधत अनेक पशुपक्षी जंगल सोडून शहरात शिरकाव करत आहेत. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोरोरोना सारख्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे.
या सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी प्रत्येकाने संवर्धनासह वृक्षारोपण करुन एक पेड मॉ के लिये चा आदर करावा. घरातील प्रत्येकाने पृथ्वीवरील जीवसृष्टीस लागणारी ऑक्सीजन युक्त दीर्घकाळ टिकणारी तसेच विविध फळा-फुलांची झाडे लावून त्यांचे संगोपन करावे. आपणास प्रत्येक प्राण्याची व वृक्षाची आवश्यकता आहे. सर्व पशुपक्षी एकमेकांवर अवलंबून आहेत. बरेचसे देश प्लास्टिक मुक्त असून भारतात सुद्धा प्लॅस्टिक बंदी आहे. मात्र त्याची परिणामकारक अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे प्लास्टिक संकट आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. जागतिक वसुंधरा दिन निमित्ताने संगोपणासह वृक्षारोपणाचा, प्लास्टिक मुक्तीचा, नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण करण्याचा संकल्प करुया. वसुंधरा दिनाच्या निमित्ताने 1 मे पर्यंत पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.