प्रेमविवाह करणा-या मुलीची गोळी झाडून हत्या

On: April 27, 2025 9:41 AM

जळगाव : मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिची गोळी झाडून हत्या केल्याची घटना चोपडा शहरात घडली. या घटने प्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनना बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृप्ती किरण वाघ असे गोळीबारीत मरण पावलेल्या विवाहीतेचे नाव आहे. किरण मंगले असे गोळी झाडणा-या सेवानिवृत्त सीआरपीएफ जवानाचे नाव आहे. शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास चोपडा शहरातील डॉ. आंबेडकर नगरात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

दोन वर्षापूर्वी मयत तृप्ती हिने अविनाश इश्वर वाघ या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर तृप्ती व तिचा पती अविनाश पुणे येथे राहण्यास गेले. अविनाशच्या बहिणीचा विवाह सोहळा चोपडा येथे होता. त्या विवाहानिमीत्त अविनाश आणि तृप्ती असे दोघे जण चोपडा येथे आले होते. या प्रसंगी तृप्ती आणी तिचा बाप किरण मंगले यांची नजरानजर झाली.

मुलगी तृप्तीचा प्रेमविवाह पसंत नसल्यामुळे ती समोर दिसताच संतापाच्या भरात किरण याने त्याच्या कब्जातील पिस्टलने तिच्यावर गोळी झाडली. तिचा बचाव करण्यासाठी सरसावलेला तिचा पती अविनाश हा देखील त्यात जखमी झाला तर तृप्ती मरण पावली. या घटने दरम्यान जमावाने केलेल्या मारहाणीत गोळी झाडणारा किरण गंभीर जखमी झाला. पुढील उपचारासाठी त्याला जळगावला नेण्यात आले.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment