गावठी कट्टा बाळगणा-यास एलसीबी पथकाने केले जेरबंद

On: April 28, 2025 8:27 AM

जळगाव : गावठी कट्टा कब्जात बाळगून विक्री करण्यासाठी जाणा-या तरुणाला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. मुदस्सीर नझर सलीम परवेज असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. गावठी कट्टा, पाच जीवंत काडतुस आणि त्याच्या कब्जातील मोटार सायकलीसह त्याला ताब्यात घेण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड यांना समजलेल्या माहितीच्या आधारे मुदस्सीर हा जळगाव येथून चाळीसगावच्या दिशेने गावठी कट्टा विक्रीसाठी जात होता. त्यानुसार शिरसोली गावाच्या अलीकडे हॉटेल आमंत्रण परिसरात त्याला अडवून त्याच्या कब्जातील घातक शस्त्र आणि पाच जीवंत काडतुस हस्तगत करण्यात आले. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटकेतील मुदस्सीर याच्याविरुद्ध यापुर्वी देखील शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली. त्याच्या साथीदारांचा शोध सुरु आहे. स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, राजेश मेढे, पोहेकॉ हरीलाल पाटील, विजय पाटील, अक्रम शेख आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले व पोलीस कॉन्स्टेबल चेतन पाटील करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment