एलसीबीचे हे.कॉ. जितेंद्र पाटील यांच्यासह दहा जणांना पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर

On: April 29, 2025 1:37 PM

जळगाव : राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सन 2024 च्या पोलिस महासंचालक सन्मान चिन्हांची सोमवारी घोषणा केली. त्यात जळगाव एलसीबीचे हे.कॉ. जिंतेंद्र राजाराम पाटील यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी अशा एकुण दहा जणांची नावे जाहीर झाली आहेत.  

पोलिस प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस महासंचालक सन्मानं चिन्ह दिले जाते. जळगाव जिल्हा पोलीस  दलातील सहाय्यक पोलिस निरिक्षक शामकांत पाटील, जगन्नाथ  पाटील, पोलिस हवालदार रमेश शंकर कुमावत (पाचोरा पोलिस स्टेशन), हरिश मधुकर कोळी, स्थानिक गुन्हे शाखेतील जितेंद्र राजाराम पाटील, गोरखनाथ रामभाऊ बागुल, विनोद बळीराम पाटील, दिलीप लक्ष्मीकांत कुलकर्णी, आशिष प्रतापराव चौधरी व पोलिस शिपाई जागृती चंद्रशेखर काळे यांचा या यादीत समावेश आहे.

जिल्हा पोलिस दलात कार्यरत असतांना पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी केलेल्या उत्तम कामगिरी व प्रशंसनीय सेवेबद्दल हे सन्मानचिन्ह दिले जाते. राष्ट्रपतींच्या पोलिस पदक, शौर्यपदकानंतर या सन्मान चिन्हांची घोषणा केली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment