आज 12 सप्टेंबरपासून भारतीय रेल्वे 40 अतिरिक्त विशेष जोड रेल्वे गाड्या म्हणजेच 80 गाड्या सुरु करणार आहे. शुक्रवारपासून या गाड्यांसाठी रेल्वेचे तिकिट आरक्षीत करण्यात आले. या 80 गाड्या अगोदर सुरु झालेल्या 30 विशेष राजधानी व 200 विशेष मेल एक्स्प्रेस गाड्यांव्यतिरिक्त आहेत.
आता या गाड्या सुरु झाल्यानंतर देशात धावणा-या एकूण प्रवासी रेल्वे गाड्यांची संख्या 310 एवढी होईल. गाड्यांची तपासणी केल्यानंतर ठरवले जात आहे की कोणत्या गाड्यांची प्रतीक्षा यादी मोठी आहे. या 40 जोड गाड्यांपैकी दिल्लीहून धावणा-या गाड्यांची संख्या 02482, 02572, 02368, 02416, 02466, 02276, 02436, 02430, 02562, 02628, 02616, 02004 याप्रमाणे आहे.
या गाड्यांमधून प्रवास करणार्या प्रवाशांनी किमान 90 मिनिट अगोदर रेल्वे स्थानक गाठायचे आहे. सर्व प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर तपासणी केली जाणार आहे. ईल. कोरोनाची लक्षणे आढळणा-या प्रवाशाला प्रवासासाठी परवानगी देण्यात येणार नाही. प्रवाशांना त्यांच्या ताब्यातील मोबाईलवर आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावे लागेल. रेल्वे प्रवाशांना उशा, ब्लँकेट, पडदे यांसारख्या वस्तू आता दिल्या जाणार नाही. कोरोना परिस्थिती सामान्य झाल्यानंतरही एसी कोचमध्ये या सुविधा आता मिळणार नाही. सामान्य प्रवासी वाहतुक पुन्हा सुरु झाल्यानंतर या वस्तू देणे बंद करण्याचा रेल्वे विचार करत आहे. धावत्या रेल्वेत शिजवलेले अन्नपदार्थ दिले जात नाही. फक्त पॅकेज केलेले अन्न देण्यात येत आहे.