हे. कॉ. जितेंद्र पाटील यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह

On: May 1, 2025 1:42 PM

जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राजाराम पाटील यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज महाराष्ट्र दिनी पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह देण्यात आले. या प्रसंगी पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह विविध गणमान्य वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सन 2024 च्या पोलिस महासंचालक सन्मान चिन्हांची घोषणा केली होती. त्यात जळगाव एलसीबीचे हे.कॉ. जितेंद्र पाटील यांच्या नावाचा समावेश करण्यात आला.

पोलिस प्रशासनातील उत्कृष्ठ कामगिरीसाठी पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह दिले जाते. हे.कॉ. जितेंद्र पाटील यांनी आपल्या आजवरच्या सेवा कालावधीत अनेक किचकट गुन्हे उघडकीस आणले आहेत. चो-या घरफोड्या दरोडे यासह अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याकामी जितेंद्र पाटील यांनी आपले योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना या सन्मान चिन्हाने सन्मानित करण्यात आले.

याशिवाय जळगाव जिल्हा पोलिस दलातील सहायक पोलिस निरीक्षक शामकांत पाटील, जगन्नाथ पाटील, पोलिस हवालदार रमेश शंकर कुमावत, हरिष मधुकर कोळी, गोरखनाथ बागुल, विनोद पाटील, दिलीप कुलकर्णी, आशिष चौधरी व पोलिस शिपाई जागृती काळे यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment