सेतु संचालक धनराज पवार सन्मानित

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील दुर्गम भागातील जनतेला ऑनलाईन सेवा देणारे सेतु संचालक धनराज पवार यांचा महाराष्ट्र दिनी तहसीलदार विजय साळवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

“आदर्श आपले सरकार सेवा केंद्र” हा पुरस्कार त्यांना सन्मानपत्राच्या माध्यमातून देण्यात आला आहे. याप्रसंगी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गजानन पिल्लेवाड, निवासी नायब तहसीलदार रमेश मेंढे,  नायब तहसीलदार व्ही. व्ही. सोळंके,  मंडळ अधिकारी अनिल येरकर, तलाठी राऊत आणि अंकुश ओंकार, भरत लढे, बाबरे, मिलमिले, ताकसांडे आदी उपस्थित होते.

दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी झालेल्या लोकसेवा हक्क दिनी तहसीलदार विजय साळवे यांनी या केंद्राला भेट दिली असता त्यांनी समाधान व्यक्त केले. 1 एप्रिल रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून धनराज पवार यांना सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here