यवतमाळ जिल्ह्यात रोखले दोन बालविवाह

On: May 4, 2025 9:21 AM

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ जिल्ह्यात होणारे दोन बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. झरीजामणी तालुक्यातील धानोरा आणि राळेगाव नजीक जळका येथे होणारे बालविवाह रोखण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या झरीजामणी तालुक्यातील धानोरा येथील सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. यावेळी अल्पवयीन मुलीच्या पालकांसह नातेवाईकांना अशा प्रकारच्या विवाहाचे दुष्परिणाम प्रशासनाकडून सांगण्यात आले. पालकांच्या लेखी जवाबासह अल्पवयीन मुलीस बाल कल्याण समीतीसमोर हजर राहण्याची लेखी सुचना देखील देण्यात आली.

या प्रकाराची माहिती बाल सरंक्षण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार आकाश बुर्रेवार यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे खातरजमा करुन पुढील कारवाई करण्यात आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विशाल जाधव, तहसीलदार अक्षय रासने, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील ठाकरे, गटविकास अधिकारी रवींद्र सांगळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रभाकर पांडे, सामाजिक कार्यकर्ता आकाश बुर्रेवार, पाटण पोलीस स्टेशनचे पोलिस अधिकारी सुनील अंबुलकर, सरपंच ईश्वरी राजगडकर, पोलीस पाटील गजानना मासटवार, ग्राम महसूल अधिकारी राजू मोरे, अंगणवाडी सेविका श्रीदेवी मेश्राम, ग्रामपंचायत अधिकारी जी. बावणे आदींचे याकामी सहकार्य लाभले.

दुस-या घटनेत जळका येथे 6 मे रोजी होणारा नियोजीत बालविवाह रोखण्यात आला आहे. जिल्हा महिला बाल कार्यालयातील फाल्गुन पालकर यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी सागर विठाळकर यांना याबाबत माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे सागर विठाळकर यांनी ग्रामपंचायत अधिकारी दीपक धनरे यांना शहानिशा करण्यास सांगितले होते. तहसीलदार अमित भोईटे, गटविकास अधिकारी केशव पवार, बालविकस प्रकल्प अधिकारी सागर विठाळकर, संस्थात्मक संरक्षण अधिकारी अविनाश पिसुरडे, सरपंच सुशीला तुमराम, सचिव दीपक धनरे, अविनाश पिसुरडे, चाइल्डलाइन प्रमुख फाल्गुन पालकर, सावित्रा पवार आदींची या कामी सहकार्य लाभले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment