बोलेरो उलटल्याने अपघात – पंधरा जखमी

On: May 5, 2025 7:39 PM

जळगाव : उसतोड कामगारांना घेऊन जाणारे बोलेरो पिकअप वाहन आज सकाळी चाळीसगाव एमआयडीसी परिसरात उलटले. या गंभीर अपघातात वाहनातील चोवीस कामगारांपैकी पाच महिला व दहा पुरुष कामगार जखमी झाले. धुळे सोलापूर महामार्गावर झालेल्या या अपघातात सेंधवा (म.प्र.) येथील सहा जखमींना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.

प्रिया सोलंकी (24), नानी जातवा (30), शांतीलाल पांगिले सैलानी (35), पप्पू हिरालाल सोलंकी (19), संतोष बळीराम सोलंकी ( 21), सरीबाई सैलानी (35) (सर्व रा. सेंधवा, मध्य प्रदेश) अशी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतलेल्यांची नावे आहेत. या सर्वांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे.

राकेश रघुनाथ सोलंकी (17), लालबाई बलराम सोलंकी  (45), चिमा पटेल (30), सुरेश सोलंकी (27), बलराम सोलंकी (30),  संगीता बलराम सोलंकी (28), दिनेश सुरेश सोलंकी (30),  हिरालाल सोलंकी (25), संतोष हुडवे (20) (सर्व रा. सेंधवा, मध्य प्रदेश) अशी सेंधवा शासकीय रुग्णालयात उपचार घेणा-या जखमींची नावे आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनसह महामार्ग वाहतूक पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्यासह हे.कॉ. रमेश पाटील, अजय पाटील, नितीश पाटील, केतन सुर्यवंशी, प्रविण पवार, राहुल नारेकर आदींनी जखमींना तातडीने रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी रवाना केले. तसेच महामार्गावरील अपघातग्रस्त वाहन बाजूला करुन वाहतुक सुरळीत केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment