गावठी कट्टयासह तरुणास अटक

On: May 6, 2025 11:56 AM

जळगाव : गावठी कट्ट्यासह बावीस वर्षाच्या तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. चेतन वसंता देऊळकार असे कुसुंबा येथील रहिवासी तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुसुंबा शिवारातील साई सिटी परिसरात एक तरुण आपल्या कब्जात गावठी कट्टा बाळगून असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक संदीप भटू पाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पो.काँ गणेश ठाकरे, नितीन ठाकुर, विशाल कोळी याच्या पथकाने चेतन देऊळकार यास ताब्यात घेतले. त्याच्या घरातील कपाटातून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment