भेटायला गेला गर्भवती पत्नीला – पळवून नेले अल्पवयीन सालीला

On: May 10, 2025 9:24 AM

जळगाव : गर्भवती पत्नीला भेटायला गेला असता अल्पवयीन सालीलाच पळवून नेणा-या जावयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची वेळ सासूवर आली. जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलिस स्टेशनला या घटने प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील जावयाचा हा प्रताप परिसरात एक चर्चेचा विषय झाला आहे.

गर्भवती पत्नीला भेटण्यासाठी जावई जामनेर तालुक्यातील सासरवाडीला आला होता. तब्येतीचे कारण पुढे करुन जावयाने सोबत त्याच्या अल्पवयीन सालीला सोबत नेले. जावयावर विश्वास ठेवत सासरच्या मंडळींनी त्याला विरोध केला नाही. मात्र सकाळची दुपार व दुपारची सायंकाळ झाली तरी जावई आणी मुलगी घरी परत आले नसल्याचे बघून सासरवाडीचे लोक हवालदिल झाले. आपल्या जावयानेच आपल्या लहान मुलीला पळवून नेल्याची सासुची खात्री झाली. अखेर नाईलाजास्तव सासुने फत्तेपुर पोलिस स्टेशन गाठत जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment