जळगाव : जळगाव शहरातील तांबापुरा भागात आज सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास सिखलकर व गवळी गटात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. या दगडफेकीत सिखलकर गटाचे दोघे तर गवळी गटाचा एक असे तीघे जण जखमी झाले आहेत. एमआयडीसी पोलिसांनी सिखलकर गटाच्या पाच जणांना अटक केली आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दंगलीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भोलासिंग जगजितसिंग बावरी (३२), जगजितसिंग हरिसिंग बावरी (५०), समकौर जगजितसिंग बावरी (४५), सोनुसिंग जगजितसिंग बावरी २५), मोहनसिंग जगजितसिंग बावरी या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अजून काही जणांना अटक केली जाण्याची शक्यत आहे. भोला सिंग बावरी हा दारुच्या नशेत मध्यरात्री रवी हटकर यांच्या घरात गेला होता. त्यामुळे रात्री घरात एकटी महिला मोठ्या प्रमाणात घाबरली होती. परिसरातील लोक जमल्यानंतर तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. सकाळी भोलासिंग गल्लीतून जात असताना महिलांनी जाब विचारला असता त्याने दगडफेक सुरु केली होती. त्यानंतर दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक सुरु झाली होती.
या दगडफेकीत भोलासिंग बावरी जगजीतसिंग बावरी व उखा हटकर हे तिघे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, पो.नि. विनायक लोकरे, स.पो.नि.अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, अशोक सनगत, सचिन पाटील, योगेश बारी, लुकमान तडवी, सिद्धेश्वर दापकर, मालती वाडीले, मंदा बैसाणे बबिता राजपूत, पूनम सोनवणे आदींच्या पथकाने घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पाच जणांना ताब्यात घेतल्यानंतर जमाव काबूत आला.