अल्पवयीन मुलीचा विनयभंग – पोस्को अंतर्गत गुन्हा

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी शहरातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली संशयित आरोपी अक्षय अशोक सुर्तीकार या घाटंजी येथील तरुणाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गु. र. न. 398/2025 कलम 78, 115 (2), 351 (2) (3) भारतीय न्याय संहिता पोस्को 12 अंतर्गत पोलीस उप निरीक्षक सुशील शर्मा यांनी हा गुन्हा दाखल केला.

 पिडीत अल्पवयीन मुलगी शैक्षणिक कामकाजा निमित्त महाविद्यालयात गेली होती. ती मैत्रिणींसोबत बोलत असताना संशयित तिला आपल्या सोबत बोलण्याचा आग्रह करू लागला. मात्र तिने नकार देत तिच्या आते भावाला फोन लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने तिचा हात धरून तिला चापटा मारुन विनयभंग केला. या गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here