दया नायक यांची कारवाई – उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास अटक

On: September 12, 2020 5:34 PM

मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या कारवाईत मातोश्रीवर धमकीचे फोन करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या रविवारी फोनवर धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी केलेल्या तपासात कोलकाता येथून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना एका अज्ञात क्रमांकावरुन धमकीचे फोन आले होते. या फोन प्रकरणी सुरक्षा यंत्रणेकडून चौकशी सुरु होती.

दुबईहून आलेल्या या फोनवरुन बोलणारा व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची धमकी फोनद्वारे देण्यात आली होती. या फोन क्रमांकाची क्राईम ब्रांचकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास सुरु असतांना एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी आरोपींचा शोध लावला. आरोपीस कोलकाता येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment