विमानतळ व विमानात आता फोटोशुटला बंदी

On: September 12, 2020 6:15 PM

नवी दिल्ली : डीजीसीएने विमान प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमावलीनुसार प्रवाशांना सरकारी विमानतळ तसेच विमानात फोटोशुट करता येणार नाही. काही विशेष प्रकरणांमध्ये परवानगीनेच फोटो शुटसाठी परवानगी मिळू शकते. त्यासाठी डीजी, जॉईंट डीजी, डेप्युटी डीजी यांची लेखी परवानगी आवश्यक राहील.
डीजीसीएने याबाबत एक आदेश काढला आहे. ‘एअरक्राफ्ट नियम १९३७ च्या नियम क्रमांक १३ नुसार कोणत्याही व्यक्तीला विमानतळ अथवा विमानात फोटो शुट करण्याची परवानगी नाही. केवळ डीजी, जॉईंट डीजी, डेप्युटी डीजी यांची लेखी परवानगी असेल तरच एखाद्या व्यक्तीला फोटो काढण्याची सवलत मिळू शकेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment